TVS launches updated Apache RTR 200
तंत्रज्ञान

TVS ने अपडेटेड Apache RTR 200 4V बाईक केली लॉन्च, मिळतील 3 राइडिंग मोड, BS6 इंजिन

टीव्हीएस मोटरने अपडेटेड 2020 अपाचे RTR 200 4V बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. यात 3 राइडिंग मोड आणि नवीन BS6 इंजिनसह अडजस्टेबल सस्पेन्शन मिळेल. हे दोन्ही फीचर्स या विभागाच्या बाइक्समध्ये प्रथमच दिलेले आहेत. मात्र, यामुळे या बाईकची किंमतही बदलली आहे. कंपनीने ह्या बाईकची बुकिंग सुरू केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  • RTR 200 4V सिंगल चॅनल एबीएस किंमत – 1.25 लाख रुपये
  • RTR 200 4V ड्युअल चॅनल एबीएस किंमत – 1.31 लाख रुपये

टीवीएस अपाचे RTR 200 ४V बाईकचे स्पेसिफिकेशन्स :

  1. टीव्हीएस अपाचे RTR 200 4V बाईकला स्पोर्ट, अर्बन आणि रेन हे तीन राईडिंग मोड मिळतील. फ्लाय मोडवर जाण्यासाठी डेडिकेटेड स्विच देखील मिळेल.
  2. अडजस्टेबल फ्रंट सस्पेन्शन
  3. अ‍ॅडजेस्टेबल क्लच आणि लीव्हर
  4. इंधन इंजेक्शन, स्लिपर क्लच, ब्लूटूथ एनेबल SmartXonnect सिस्टम, ग्लिड थ्रो टेक्नोलॉजी (GTT+), एलईडी हेडलॅम्प अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.
  5. यात 198cc सिंगल सिलेंडर 4 व्हॉल्व्ह, ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे 8500 Rpm वर 20.2 bhp पॉवर आणि 7000 Rpm वर 18.1 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
  6. बाईकचे फ्रंट सस्पेंशन अपग्रेड केले गेले असून मोनोशॉक युनिट मागील बाजूस देण्यात आले आहे.
  7. यात समोर आणि मागील बाजूस डिस्क ब्रेकसह सिंगल चॅनेल आणि ड्युअल चॅनेल एबीएसचा पर्याय आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत