Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe
अहिल्यानगर कोरोना महाराष्ट्र राजकारण

रेमडेसिवीर: विखे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज, व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा करायला नको होता, हायकोर्टाने सुनावले

औरंगाबाद: एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर ताशेरे ओढले. डॉ. सुजय विखे यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी […]

Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe
अहिल्यानगर कोरोना महाराष्ट्र राजकारण

‘तो’ व्हिडिओ पाहिला तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, कोणत्याही कारवाईला घाबरत नाही – खासदार सुजय विखे

नगर : खासदार सुजय विखे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्यावर आपले मत स्पष्ट शब्दांत मांडले आहे.  आपल्याकडे सर्व कागदपत्रे आहेत असून कोणत्याही कारवाईला आपण घाबरत नाही. इंजेक्शनमुळे ज्यांचे जीव वाचले, ते लोक माझ्या पाठिशी आहेत. ती इंजेक्शन संपली आहेत. इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे जप्त काय करणार? माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर सर्व […]

More than 60 thousand patients on oxygen in Maharashtra
कोरोना महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रात ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना केली विनंती…

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील भीषण परिस्थिती विषयी सांगितले. महाराष्ट्रात सध्या ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असून ७६ हजार ३०० ऑक्सिजन बेड्स […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
कोरोना महाराष्ट्र

मोठा निर्णय – किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार; ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक

मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई राजकारण

देवेंद्र फडणवीसांना भोवणार ‘ते’ प्रकरण? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत…

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी प्रकरणी पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस यांना अडचणीचे ठरू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबतचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. गृहमंत्री दिलीप […]