नवी दिल्ली : आशिया कपचा भाग म्हणून दुबईमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखालील चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली असून, अधिवक्ता स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्या माध्यमातून ती सर्वोच्च न्यायालयात सादर […]
टॅग: ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूर: भारतीय हवाई दलाने ५ पाकिस्तानी विमाने व AEW&C पाडली; एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांचा मोठा खुलासा
बेंगळुरू : ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठा खुलासा करताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT विमान नष्ट केले. हे विशेष लष्करी विमान हवाई देखरेख आणि पूर्वसूचना यासाठी डिझाइन केलेले होते. बेंगळुरू येथे आयोजित […]
‘दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं’; ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत राज ठाकरे यांची वेगळी भूमिका, सरकारवर सडकून टीका
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून तीव्र कारवाई केली. ही कारवाई ७ मे रोजी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास करण्यात आली. देशभरातून या कारवाईचे स्वागत होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ऑपरेशनबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. […]
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली ऑपरेशन सिंदूरबाबत संपूर्ण माहिती
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विक्रम मिस्री (परराष्ट्र सचिव), कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सैन्याच्या कारवाईवर आपले विचार व्यक्त केले. पत्रकार परिषदेदरम्यान, लष्कराने दहशतवादाविरुद्धचा एक व्हिडीओ देखील दाखवला ज्यामध्ये मध्य प्रदेश हल्ला, २६/११ हल्ला आणि पहलगाम हल्ला दाखवण्यात आला होता. कर्नल सोफिया कुरेशी […]
‘ऑपरेशन सिंदूर’ने हादरलेल्या पाकिस्तानचा भ्याड हल्ला, LOC ओलांडून गोळीबार, एका महिलेसह ३ भारतीयांचा मृत्यू
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केलं आहे. या कारवाईत सुमारे […]





