अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इतिहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान ‘शिवाई’ या राज्यातील पहिल्या विद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. एसटी […]
टॅग: state
राज्य होणार कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त, राजेश टोपे यांनी दिली माहिती
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आता १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई होईल अशीही […]
मला चावण्याची हिम्मत कशी झाली? असे विचारत वृद्धाने सापाला चावून चावून मारून टाकलं, मग…
बिहार : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीला साप चावला, त्यानंतर नशेत असलेल्या त्या वृद्धाने सापाला चावून चावून मारून टाकलं. त्यानंतर या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. रामा महतो (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो नालंदाच्या चंडी पोलीस स्टेशन परिसरातील माधोपुर डीह गावचा रहिवासी होता. सर्पदंशाने मृत्यू झाल्याची […]
‘मौत तो आनी है तो फिर..’ प्रसिद्ध कवी कुंवर बेचेन यांचे कोरोनाने निधन
नवी दिल्ली : प्रख्यात कवी कुंवर बेचेन यांचे आज (२९ एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता आणि त्यांच्यावर नोएडा येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसिद्ध कवी डॉ कुमार विश्वास यांनी ट्वीटरवर ही माहिती शेअर केली. कुंवर बेचेन आणि त्यांची पत्नी संतोष कुंवर या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. या दोघांचा कोरोना अहवाल […]
राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा – शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. वसंतदादा शुगर इस्टिट्यूटकडून याबाबत सर्व साखर कारखान्यांना पत्र देण्यात आलं आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळं सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करावे, असं पत्रात म्हटलं आहे. सर्व […]
पुन्हा लॉकडाऊन?… नियम न पाळल्यास कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, केल्या ‘ह्या’ सूचना
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या […]
राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई देणार – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार
मुंबई : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली. पशुसंवर्धनमंत्री केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा […]
राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण
मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजाराच्या घरात आली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. इंग्लंडमधील करोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी […]
राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल महत्वाचा निर्णय
राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन परिस्थितीनुसार शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत […]
जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी
नवी दिल्लीः केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]