पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात मंगळवारी संध्याकाळी सात वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित बालिका ऊसतोड मजूर कुटुंबातील असून आरोपी देखील त्याच वस्तीमध्ये राहणारा ऊसतोड कामगार असल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचे नाव देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पीडित […]
टॅग: Maharashtra Crime News
नागपूर हादरले! मुलाच्या पहिल्या वाढदिवशीच भाजप वॉर्ड अध्यक्षाची निर्घृण हत्या
नागपूर : मुलाच्या पहिल्या वाढदिवशीच भारतीय जनता पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटाभट्टी चौक परिसरात घडली. सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश शाहू (वय 40, रा. शाहू मोहल्ला, वृंदावननगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भंगारचा व्यवसाय करीत होते. […]
पुण्यात मित्रच ठरले शत्रू! व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या
पुणे : पुणे शहर आणि परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी एक भीषण घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. पिंपरीतील वडमुखवाडी परिसरात मित्रांनीच एका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अलंकापुरम 90 फुटी रस्ता, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी घडली. नितीन शंकर गिलबिले (वय 37) असे मृत व्यावसायिकाचे […]
नकुल भोईर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पत्नी व तिच्या प्रियकराने रचला खूनाचा कट
पुणे : शहर हादरवून टाकणाऱ्या नकुल भोईर हत्येच्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिस तपासात उघड झाले आहे की नकुल भोईरची हत्या ही त्याची पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१) यांनी एकत्रितपणे नियोजित करून केली होती. चिंचवड पोलिसांनी सिद्धार्थ पवारला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू […]
सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट! पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसह केली पतीची निर्घृण हत्या, आणि…
रायगड : रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी केवळ २४ तासांत गुन्ह्याची उकल केली आहे. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, पेण) असे आहे. त्याचा […]
धक्कादायक! प्रेमसंबंधातून १५ वर्षीय मुलगी गर्भवती, बाळ जन्मलं आणि…
मुंबई : कल्याण-पश्चिमेतील बारावे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून जन्मलेलं नवजात बाळ जन्मताच कचऱ्याच्या डब्यात टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीचा पर्दाफाश केला असून २२ वर्षीय रोहित प्रदीप पांडे याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे […]
बीड हादरले! परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी तिघांना पकडले, तृतीयपंथी आरोपी फरार
बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात तिघा नराधमांनी एका 20 वर्षीय परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून पोलिसांचा त्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबईहून […]
प्रियकराकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : भीमनगर येथील १९ वर्षीय प्रारंभी दीपक इंगळे या तरुणीने तिच्या प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १९ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. छावणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सचिन राजू भिसे (वय १९, रा. मिल कॉर्नर) याला अटक केली […]
पोलीस निरीक्षकावर होमगार्ड महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नागपूर : नागपूरमध्ये एका पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर महिला होमगार्डचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अशोक […]








