मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या […]
टॅग: Devendra Fadnavis
राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगारासाठी ‘युथ फॉर जॉब्स’ संस्थेसोबत सामंजस्य करार
मुंबई : राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देत, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करत, रोजगाराच्या संधी दिव्यांगांनाही उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षांत नोंदणीकृत दिव्यांगांना युडीआयडी (Unique Disability ID) देण्यात येणार आहे. शासन दिव्यांगांच्या योजना प्रभावीपणे राबवित आहे. स्वयंसेवी संस्थादेखील दिव्यांगांच्या विकासासाठी पुढे येत आहेत. […]
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज मुख्यमंत्री […]
धनंजय मुंडे-धस भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांच्या पाठिशी ठाम समर्थन, संजय राऊत यांच्यावर टीका: मुर्खांना मी उत्तर देत नाही
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवर चर्चा रंगली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे विरोधकांच्या लक्ष्यावर आले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “संतोष देशमुख यांच्या […]
ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा…, छगन भुजबळांनी जाहीर केली नाराजी
नागपूर : छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. ”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]
‘कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही’, किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “हा विषय गंभीर आहे. राजकारणात […]
आयुष्यात असे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं!, देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जळगावचा दौरा केला. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक दिव्यांग तरुणी आली, जिला हात नाहीत. तिने पायाच्या अंगठ्याने देवेंद्र फडणवीसांना टिळा लावला आणि पायानेच पूजेचे ताट पकडत फडणवीसांचं औक्षण केलं. हे पाहून देवेंद्र फडणवीस भावुक झाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रसंगाचा भावनिक व्हिडीओ ट्वीट करत आपला अनुभव सांगितला. […]
जनहिताची जपणूक करत लोकशाही अधिक बळकट करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेनी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी’च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदचे लोकप्रतिनिधी यांचे ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३’चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, […]
अंभोरा पर्यटन केंद्रासाठी २०० कोटी देणार – देवेंद्र फडणवीस
नागपूर : अंभोरा पर्यटन स्थळासाठी नियामक मंडळाची मान्यता घेऊन २०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शनिवारी दिली. ७८२ कोटीच्या नागपूर-उमरेड चारपदरी महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नागपूर […]










