भारतीयांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे कि, भारतात डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, “भारतात अनेक लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. […]
टॅग: Corona Vaccine Update
कोरोनावरची लस आली, ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना होणार उपलब्ध
कोरोनावरची लस कधी उपलब्ध होणार याची सामान्यांना उत्सुकता लागली आहे. आता प्रतीक्षा संपली असून लवकरच कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या पुढच्या आठवड्यापासून वापराला मंजुरी दिली आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू […]
दिलासादायक बातमी : कोरोना लसीची चाचणी 90 टक्के यशस्वी; जाणून घ्या कधी येणार लस बाजारात..
वॉशिंग्टन : संपूर्ण जग कोरोनाच्या लसीची वाट बघत आहेत. आता कदाचित कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिकेच्या फायजर या कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे […]



