मुंबई : एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार 39 कोटी रुपये महामंडळाला वितरित करण्यात आले असून या निधीतून एसटीच्या 300 बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थीनींना बारावीपर्यंत शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते, त्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा निधी वापरण्यात […]
टॅग: Ajit Pawar
पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या […]
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ठाकरे सरकार विधानसभेत विधेयक मांडणार – अजित पवार
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर आता राज्य सरकार यासंदर्भात नवा कायदा तयार करणार आहे. त्यासाठी विधानसभेत सोमवारी रितसर विधेयक मांडून मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी राज्यात नव्या कायद्याची अंमलबजावणी होईल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना माहिती दिली. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न […]
‘ती भेट आजही स्मरणात आहे’, ‘सीआरपीएफ’चे वीर जवान अशोक इंगवले यांना अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “तीन वर्षांपूर्वी १७ फेब्रुवारी २०१९ ला माझी आणि अशोकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्याच्यासोबतची ती भेट आजही स्मरणात आहे. आज अशोकला वीरमरण आल्याचे […]
सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी, परदेशी आणि सहकारी बँकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत मॅको बँकेनेही टिकून राहिले पाहिजे. नागरिकांना आधुनिक सेवासुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. सर्व बँकांच्या पदाधिकारी आणि सभासदांनी काम करीत असतांना जागरुक राहणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दि महाराष्ट्र […]
राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, हे वृत्त धादांत खोटं…
पुणे : राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. हे वृत्त धादांत खोटे आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते शनिवारी पु्ण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते. त्यामुळे या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. अजित पवार […]
खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी जलतरण तलाव सुरू करा, अजित पवार यांचे निर्देश
पुणे : पुणे जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम […]
पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा, सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करा, अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. अण्णासाहेब […]
वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर वाढविलेला जीएसटी रद्द करावा, अजित पवार यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मागणी
मुंबई : वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर उद्यापासून (1 जानेवारी 2022) लागू होणारी 5 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांची जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी तसेच केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी नुकसानभरपाई 14 टक्के वार्षिक वाढीसह 30 जून 2022 नंतरही कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. […]
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार, अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन
मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला, यावर उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले. अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही धानाला बोनस […]








