मुंबई : महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. […]
टॅग: Ajit Pawar
शेळी, कुक्कुटपालन योजनांच्या धर्तीवर मेंढ्यांसाठीही अर्धबंदिस्त निवारा योजना प्रायोगिक तत्वावर राबवावी – अजित पवार
मुंबई : धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराईक्षेत्रालगतची जमिन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात […]
ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार, अजित पवार यांची माहिती
मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या. पावसाळी […]
वित्तविभागाची जबाबदारी मिळताच अजित पवारांची कामकाजाला सुरुवात, बैठकीत घेतला कामकाजाचा आढावा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व […]
अजित पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, म्हणाले – ‘ते करिष्माई नेते’
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांचे वर्णन करिष्माई नेते असे केले आहे. अजित पवार शुक्रवारी जळगावात राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले- नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचेही […]
देहूमध्ये अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, प्रवीण दरेकरांनी केली ‘ही’ विनंती
पुणे : देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, अजित […]
आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसिस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. विधानभवन येथे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘गॅप ॲनालिसिस’ योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या […]
कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
मुंबई : कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना कृष्णा खोरे मध्ये समाविष्ट असलेल्या अथवा लगतच्या जिल्ह्यातच जमीन वितरण करावी. याबाबतची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिल्या. कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत […]
सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. 29 : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. […]
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरामार्फत देशाची आध्यात्मिक, सांस्कृतिक एकता अखंडित ठेवण्याचं काम होईल – अजित पवार
मुंबई : “प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम आहेत. त्यांनी आदर्श जीवनाचा वस्तूपाठ घालून दिला. धैर्य, शौर्य, त्याग, स्नेह, संस्कार, पराक्रम, दृढ निश्चयासारखे गुण जीवनात कसे वापरावेत हे आचरणातून दाखवून दिलं. राजसत्तेचा त्याग केला. मात्र, सत्याची लढाई निष्ठेनं लढली. दुष्प्रवृत्तींच्या विनाशासाठी सत्प्रवृत्तींना संघटित करण्याचं कौशल्य दाखवलं. शबरीची उष्टी बोरं प्रेमानं खाताना त्यांचं समतेचं, ममतेचं रुप दिसलं. सेतूनिर्मितीत खारीच्या […]









