नागपूर : नागपुरात एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी शिवारात एका टॅक्सी चालक तरुणाची आरोपींनी अतिशय निर्घृण हत्या केली. अगोदर आरोपींनी या तरुणाचा गळा आवळला आणि त्याला मृत समजून फेकून दिले. काही तासानंतर तो जिवंतच असल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्या तरुणाचा गळा चिरला आणि तेथून निघून गेले. काही वेळाने ते […]
टॅग: नागपूर
अभिनेता गुरमीत चौधरीची स्तुत्य कामगिरी, अवघ्या १६ दिवसांत उभारले हजार बेड्सचे कोविड हॉस्पिटल
मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी सरकारच्या मदतीसाठी काही समाजसेवी संस्था, काही नागरिक तसेच मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारही गरजू लोकांना मदत करत आहेत. आता अभिनेता गुरमीत चौधरीही कोरोना पेशंटसाठी काम करत आहे. त्याने महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये ‘आस्था’ नावाने कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी गुरमीतने लखनऊ, […]
नागपुरात कोरोना बाधित महिलेची मानसिक तणावातून आत्महत्या
नागपूर : नागपुरात एका कोरोना बाधित महिलेने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. वर्धा मार्गावरील एम्स हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन रेणुका रमेश अलघटे (वय ४५) नावाच्या महिलेने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका अलघटे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यातच त्यांना प्रकृती खालावल्याने ३ […]
मोठी बातमी : टेकऑफ करताच गळाले विमानाचे चाक, धावपट्टीवर ‘फोम’ पसरवून केली आश्चर्यजनक लँडिंग
मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या वैद्यकीय विमानात (एअर ऍम्ब्युलन्स) झालेल्या बिघाडानंतर प्रचंड गोंधळ झाला, पण नंतर हे विमान सुखरुप मुंबईत दाखल झाले आहे. विमानात गडबड झाल्याचे लक्षात येताच ते मुंबईकडे वळविण्यात आले. यासाठी संपूर्ण इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. क्रॅश लँडिंगची भीती निर्माण झाली होती, पण अखेर या विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळाले. या विमानात एक […]
‘त्या’ आजोबांनी खरंच तरुण रुग्णासाठी बेड सोडला होता का? जाणून घ्या…
नागपूर : नारायणराव दाभाडकर यांचं कोरोनामुळे राहत्या घरी निधन झालं. एका तरुण कोरोना रुग्णासाठी त्यांनी बेड सोडला अशी बातमी आल्यानंतर त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत नारायणराव दाभाडकर यांनी दुसऱ्या रुग्णासाठी बेड नाकारला अन् मृत्यूला कवटाळलं अशी माहिती पोस्टमध्ये दिली. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी […]
महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; हॉस्पिटलमध्ये अत्याचाराचा प्रयत्न
नागपूर: महिला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्येच शारीरिक सुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर मधील कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून सहकारी डॉक्टरला अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. पीडित […]
तरुणीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नृत्य शिक्षकाला अटक
नागपूर : २२ वर्षीय तरुणीला दारू पाजून नृत्य शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रोमियो गजानन गोडबोले (वय २५), असे या नृत्य शिक्षकाचे नाव आहे. अजनी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करून या व्यक्तीला अटक केली आहे. पीडित तरुणी मूळची वर्ध्याची असून तिचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळे ती तणावात होती. […]
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी केला होता विमानाने प्रवास
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. आता अशी काही कागदपत्रे पुढे आली आहेत, ज्यावरून असे दिसून येत आहे की या काळात अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास […]
धक्कादायक : नागपुरात बंद मॉलमध्ये आढळला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह
नागपूर : सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एएसआय नरेंद्र बघेल या पोलीस अधिकार्याच्या मुलाचा मृतदेह मॉलमध्ये आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे. फॉर्च्युन मॉल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे या प्रकरणात गूढ निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाने २०१६ मध्ये […]
भयंकर : अश्लील चित्रफीत दाखवून बेसावध करत पतीची निर्घृण हत्या, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
नागपूर : नागपूरमध्ये एका महिलेने तिच्या नवऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने तिच्या नवऱ्याला अश्लील चित्रफीत दाखवून त्याचे हात खुर्चीला बांधले आणि नंतर त्याच्या गळ्यावरून चाकू फिरवत त्याचा खून केला. लक्ष्मण मलिक (वय ६५) यांच्या हत्येचा उलगडा करीत गुन्हेशाखा पोलिसांनी याप्रकरणी मारेकरी पत्नीला अटक केली आहे. स्वाती लक्ष्मण मलिक (वय ३१) […]










