मुंबई : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये रत्नागिरी येथे शीतगृह उभारण्याबाबत नुकताच करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या पुढाकाराने रत्नागिरी रेल्वे विभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कोकण रेल्वे कार्पोरेशनचे संचालक (संचलन व कमर्शियल) संतोषकुमार झा, मुख्य व्यवस्थापक […]
टॅग: रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, नाना पटोले, राजन साळवी, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. […]
पुढील 2 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहणार
पुणे : पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील २-३ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणानुसार, रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे […]
रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, 30 हून अधिक प्रवासी जखमी
रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. धोपावे – चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस एका वळणावर समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. या […]
धक्कादायक खुलासा! माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची पतीनेच केली निर्घृण हत्या, जाळून राख समुद्रात फेकली…
रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींमध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी […]
दापोलीत दोन बसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी जखमी, एक बस चालक गंभीर जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज (२५ ऑगस्ट) सकाळी दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला. दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एक बस चालक गंभीर जखमी झाला आहे. एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बोरिवली – दापोली एसटी दापोलीकडे येत असताना […]
राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 25 ते […]
गौण खनिज परवान्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन यामधून चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथील चिरेखाण व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणात चिरेखाणीबरोबरच मुरुममाती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी चिरेखाण […]
आज ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट
पुणे : राज्यात येत्या पाच दिवसांत तीव्र हवामान सक्रिय राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रावर तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील […]
रत्नागिरीतील रिक्त जागा लवकरच भरणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात टोपे मंत्रालयातून सहभागी झाले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, […]