Mumbai to Konkan Sea Passenger Transport Approved
महाराष्ट्र मुंबई

कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी वाहतूकीस मान्यता

मुंबई : मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माझगाव भाऊचा धक्का येथे एम टू एम प्रिन्सेस या रो-रो कंपनीची प्रवासी वाहतूक सेवेसाठी पूर्वतयारीची पाहणी बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली.

मंत्री राणे म्हणाले “सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी तीन तास व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पाच ते सहा तास इतका अवधी लागणार असून कोकणवासीयांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. या वाहतुकीला केंद्र व राज्य सरकारच्या विविध परवानग्या प्राप्त करूनच मान्यता दिली जाते. येथून पुढे या मार्गावर सागरी प्रवासी जलवाहतुकीसाठी अजून वाहतूक कंपन्या पुढे येत आहेत.”

यावेळी त्यांनी एम टू एम प्रिन्सेस या प्रवासी बोटीची फिरून पाहणी केली.

आवश्यक पूर्व तयारी झाली असली तरी सागरी वाहतुकीसाठी समुद्री वातावरण या बाबी तपासून ‘ एम टू एम प्रिन्सेस’ कंपनीची रो-रो प्रवासी जलवाहतूक सुरू होणार आहे. अशी माहिती जलवाहतूक सेवा कंपनीच्या वतीने यावेळी देण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत