मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत आहे. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात. ही पदभरती गतीने करण्याबाबत आणि बहुपर्यायी (मल्टीकॅडर) भरती प्रक्रियेत प्रतिक्षा यादी सुरू करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती […]
टॅग: महाराष्ट्र
रविंद्र धंगेकर यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, आज घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर करताना धंगेकर यांनी शिवसेनेत (शिंदे गट) सामील होण्याचे संकेत देत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हणाले. पत्रकारांशी बोलताना धंगेकर यांनी स्पष्ट केले […]
पुणे : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची अजित पवारांची मागणी
पुणे : पुण्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणीवर स्वारगेट एसटी डेपोमध्ये थांबलेल्या शिवशाही बसमध्ये तिच्या गावी जात असताना बलात्कार करण्यात आला. पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव असून, त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी आठ विशेष पथके रवाना करण्यात […]
हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी ३० दिवसांची मुदतवाढ
मुंबई : हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दि. 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ही मुदत आणखी 30 दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. 24 फेब्रुवारी 2025 अखेर राज्यात 29 हजार 254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 161 शेतकऱ्यांकडून 1813.86 क्विंटल तूर […]
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज मुख्यमंत्री […]
पालघरमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार, ४५ वर्षीय आरोपीला सुरतमधून अटक
पालघर : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलींपैकी दोन मुली सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पालघरमधील […]
रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा, उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज […]
एकनाथ शिंदेंनंतर आता भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी
बुलढाणा : भाजपाच्या एका महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याची घटना ताजी असतानाच बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना थेट पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार […]
शिर्डीत ‘नक्शा’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू; शहरी भूअभिलेख डिजिटायझेशनसाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल
शिर्डी : केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांमध्ये “नक्शा” प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश आहे. त्यापैकी एक असलेल्या शिर्डी नगरपरिषद क्षेत्रात आजपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शहराच्या हद्दीतील संपूर्ण भूभागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशातील रायसेन येथे “नक्शा” […]
कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी, लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयतेने हत्या केली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींना फाशी दिली जावी, या मागणीसाठी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलनं झाली होती. अखेर न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता या घटनेला आठ […]










