NIA arrests former mumbai police officer pradeep sharma

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएनं आज पहाटे शर्मा यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक करण्यात आले आहे. आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पहाटे एनआयएच्या टीमने धाड टाकली होती. […]

अधिक वाचा
NIA team recreates Mansukh Hiren's murder scene

NIA च्या टीमने केले मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या घटनेचे नाट्यरूपांतरण

अँटिलीया प्रकरणात मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास आता एटीएस कडून NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम रात्री उशीरा रेतीबंदर खाडीत त्या ठिकाणी गेली जिथे 5 मार्चला मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. मनसुख यांची हत्या रात्री झाली होती, त्यामुळे NIA पथक सचिन वाझे यांच्यासमवेत रात्री तेथे पोहोचले आणि त्यांनी गुन्हा घडला त्या दिवशीच्या संपूर्ण घटनेचे […]

अधिक वाचा
The mystery of Mansukh Hiren's death increased

मोठी बातमी : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA करणार

मुंबई : गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास यापूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत होतं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ […]

अधिक वाचा
Another body was found at the spot where Mansukh Hiren's body was found

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथेच आढळला आणखी एक मृतदेह

ठाणे : मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह सापडला. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाची ओळख पटलेली असून शेख सलीम अब्दुल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल […]

अधिक वाचा
Transfer of Sachin Waze from Crime Branch

क्राईम ब्रान्चमधून सचिन वाझे यांची बदली, विरोधकांनी केली अटक करण्याची मागणी

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम […]

अधिक वाचा
Devendra Fadnavis's serious allegations against Sachin Waze in mansukh hiren case

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचे सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप, उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच सचिन वाझेंना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा तक्रारीचा अर्ज देखील […]

अधिक वाचा
The mystery of Mansukh Hiren's death increased

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ वाढले, मृतदेहाच्या तोंडात पाच रुमाल कोंबलेले आढळले

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराच्या अँटिलीयाच्या बाहेर संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन यांची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. वास्तविक, हिरेन यांच्या मृतदेहाच्या तपासणी दरम्यान त्यांच्या तोंडातून पाच हातरुमाल बाहेर आले आहेत. तसेच त्यांचा मृतदेह नाल्यातून सापडला आहे. […]

अधिक वाचा