Devendra Fadnavis's serious allegations against Sachin Waze in mansukh hiren case
ठाणे महाराष्ट्र मुंबई

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचे सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप, उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच सचिन वाझेंना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा तक्रारीचा अर्ज देखील वाचून दाखवला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले कि, “२०१७ चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसरा सचिन हिंदुराव वझे. मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्याकडे आहे. तिथे जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे. यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत? इतके पुरावे असताना अटक का होत नाही. त्यामुळं माझी मागणी आहे की तात्काळ सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे.”

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं कि, “आम्हाला संशय आहे की मनसुख हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत फेकून देण्यात आला. खाडीत भरतीची वेळ असल्यानं मनसुख हिरन यांचा मृतदेह किनाऱ्यावर येणार नाही, असं मारेकऱ्यांना वाटलं. आणि तिथेच त्यांची चूक झाली. त्यांच्या दुर्दैवानं आणि कायद्याच्या सुदैवानं खाडीत भरती न आल्यानं मृतदेह किनाऱ्यावर आला आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.”

विमला हिरेन यांचा जबाब :

विमला हिरेन यांनी जबाबात म्हटलं आहे कि, “२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वाझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर ते १०. ३० वाजता आले. दिवसभर सचिन वाझेंसोबत होतो. असं त्यांनी मला सांगितलं. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा सचिन वाझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घरी आणून ठेवली. त्यावर सचिन वाझे यांचे नाव व स्वाक्षरीदेखील आहे.’ ३ मार्च रोजी माझे पती दुकान बंद करुन घरी आले, घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सचिन वाझेंनी मला सांगितलं की तु या प्रकरणात अटक हो. मी तुला दोन दिवसांत जामिनावर सोडवतो. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची विनंती आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत