मुंबई : जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वर्षभराचे संपूर्ण वेतन रुपये ३१ लाख १८ हजार २८६ इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यात मुसळधार पाऊस व महापुरामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित नागरिकांना मदत पुरविण्यासाठी मुख्यमंत्री […]
टॅग: पाऊस
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी […]
अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना
मुंबई : भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून […]
राज्यात आज व उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; […]
खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग
मुंबई : खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे […]
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु
मुंबई : १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. […]
पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस
मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी, […]
धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान
परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने […]
राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्व भागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे […]
राज्यात पुन्हा परतणार पाऊस, ‘या’ पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी
पुणे : मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतणार असून नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबरला राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला […]









