पुणे : मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतणार असून नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबरला राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला असून याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
१ – २ नोव्हेंबरला राज्यात दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जने सह पावसाची शक्यता …@RMC_Mumbai
IMD pic.twitter.com/g9SkbA6i4k— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 29, 2021
दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रीय होणार आहे. यावेळी महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




