Ramdas Kadam infected with corona
महाराष्ट्र मुंबई

रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणताही संशय मनात न ठेवता सर्वांनी लस घ्यावी असे आवाहनही त्यावेळी कदम यांनी केले होते. रामदास कदम यांना कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर […]

Salil Kulkarni infected with corona
महाराष्ट्र

सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ते सध्या घरीच विलगीकरणात आहेत. सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले कि, “सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरीच विलगीकरणात असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली आहे. गेल्या एका […]

'Dangal' fame actress Fatima Sana Sheikh infected with corona
मनोरंजन

‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिला कोरोनाची लागण

बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनंतर आता ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: ही माहिती दिली आहे. सनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत सांगितले की तिची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यानंतर तिने घरीच स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की ती पूर्ण काळजी घेत आहे आणि […]

Paresh Rawal infected with corona
मनोरंजन

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. Unfortunately, I have tested positive for COVID-19. All those that have come in contact with me in the last 10 days are requested to please […]

maharashtra records highest number of daily cases of corona
कोरोना महाराष्ट्र

चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्येत होतेय विक्रमी वाढ, आज राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित

राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आजही दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. […]

social activist Vilas Wagh dies due to Corona
पुणे महाराष्ट्र

ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता आणि इतरांना आधार देणारा सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रा. विलास वाघ‌ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे […]

Lockdown announced in Nagpur city
बीड महाराष्ट्र

ब्रेकिंग : बीड आणि नांदेड जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर

बीड : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शहरात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यातही १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यात २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश जारी केले […]

Aamir Khan has tested positive for coronavirus
मनोरंजन

ब्रेकिंग : आमिर खानला कोरोनाची लागण

अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या स्वतःच्या घरात विलगीकरणात आहे. आमिरच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. आमिरच्या प्रवक्त्याने सांगितले कि, “आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. सर्व प्रोटोकॉलचे पालन करीत तो घरीच विलगीकरणात आहे आणि तो ठीक आहे. अलिकडच्या काळात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची चाचणी घ्यावी. तुमच्या […]

centre writes to states to increase the interval between two doses of covishield vaccine
देश

बिग ब्रेकिंग : केंद्राकडून महत्वाच्या सूचना, कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवा

नवी दिल्ली : भारतात पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कोविशील्ड संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यास सांगितले आहे. एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशीनुसार या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवडे करण्यास सांगितले आहे. नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप आणि लस […]

Actor Karthik Aryan infected with corona
मनोरंजन

अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण

अभिनेता कार्तिक आर्यन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि चाहत्यांना तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.   View this post on Instagram   A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)