नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोरोना लस कोवॅक्सीनला जर्मनीने मान्यता दिली आहे. ही लस भारतात तयार झाली आहे. या मंजुरीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यानंतर आता जर्मनीला जाणाऱ्या सर्व लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय प्रवाशांना 1 जूनपासून लसीकरण प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. कोवॅक्सीनला ही मान्यता प्रवासासाठी देण्यात आली आहे. लोकांना मोठा दिलासा […]
Tag: कोरोना लस
मोठी बातमी! आता 2 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, DGCI ने दिली कोवॅक्सिन लसीला मान्यता
नवी दिल्ली : Covaxin कोरोना लसीसंबंधित मोठी बातमी आली आहे. आता 2 ते 18 वयापर्यंतच्या मुलांना कोवॅक्सिन या लसीने लसीकरण करता येणार आहे. DCGI कडून त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोवॅक्सिन लस बनवली आहे. कोवॅक्सिन ही भारतीय कोरोना लस आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोवॅक्सिन लस कोरोना विषाणूविरूद्ध सुमारे 78 टक्के […]
मोठी बातमी! आता १२ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देता येणार, ‘या’ लसीला मिळाली मंजुरी
नवी दिल्ली : भारतीय औषधी कंपनी झायडस कॅडिलाची कोरोना लस Zycov-D ला DGCI ने शुक्रवारी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली डीएनए वर आधारित लस आहे. ही लस 12 वर्षे व त्यावरील मुले आणि प्रौढांना दिली जाऊ शकते. झायडस कॅडिलाच्या मते, आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांवर या लसीची सर्वात मोठी क्लिनिकल चाचणी […]
कोरोना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
नवी दिल्ली : संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. डेली मेलच्या अहवालानुसार, रशियामधील लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करू नये, असा सल्ला यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला […]
महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस
ठाणे : एका २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी कोरोना लसीचे तीन डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोड परिसरातील आनंदनगर आरोग्य केंद्रामध्ये २५ जून रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेची प्रकृती स्थिर असली, तरी तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. महापौरांनी या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन […]
मोठी बातमी : कोवोवॅक्स कोरोना लसीचे उत्पादन सुरु, सीरम इन्स्टिट्यूटने दिली माहिती
पुणे : अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोव्हावॅक्स आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट यांच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोवोवॅक्स या कोरोना लसीचे उत्पादन सुरुवात करण्यात आले आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्विट करत म्हटले कि, “हा एक नवा माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील आमच्या कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली आहे.” […]
मोठी बातमी : फायझरने 12 वर्षाखालील मुलांवर सुरू केल्या कोरोना लसीच्या ट्रायल
अमेरिका : अमेरिकेची कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरने 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात काही निरोगी मुलांना कोरोना लस दिली जाईल. चाचणीसाठी फायझरने जगातील चार देशांतील 4,500 हून अधिक मुलांना निवडले आहे. या चार प्रमुख देशांमध्ये अमेरिका, फिनलँड, पोलंड आणि स्पेनचा समावेश आहे. फायझरने याबाबत माहिती देताना सांगितले की, […]
ब्रेकिंग : केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीचे कमाल दर केले निश्चित
नवी दिल्ली : केंद्राने आज खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसीचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत कोविशील्डची किंमत ७८० रुपये, कोवॅक्सीनची किंमत 1410 रुपये आणि रशियन लस स्पुटनिक व्ही लसीची किंमत 1145 रुपये इतकी आहे. निर्धारित दरासाठी दररोज किंमतींवर नियंत्रण ठेवले जाईल आणि परीक्षण केले जाईल. अधिक शुल्क आकारल्यास कोणत्याही खासगी लसीकरण केंद्रावर कठोर कारवाई […]
चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता
बीजिंग : चीनमध्ये 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाली आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी लस मंजूर करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना लस फक्त 18 वर्षांवरील लोकांना दिली जात होती. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि इतर काही देशांमध्ये 12 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन […]
बंगालमध्ये लस प्रमाणपत्रावर लावणार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल सरकार आता राज्यात कोरोना लस प्रमाणपत्र देताना पंतप्रधान मोदींच्या ऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो लावणार आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारने कोरोना लस घेणाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात पंतप्रधानांऐवजी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो वापरल्याने गदारोळ झाला होता. राज्य सरकारने खरेदी केलली लस टोचल्यानंतर प्रत्येक प्रमाणपत्रावर यापुढे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो […]