covid vaccine for kids

मोठी बातमी! आता 2 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, DGCI ने दिली कोवॅक्सिन लसीला मान्यता

देश

नवी दिल्ली : Covaxin कोरोना लसीसंबंधित मोठी बातमी आली आहे. आता 2 ते 18 वयापर्यंतच्या मुलांना कोवॅक्सिन या लसीने लसीकरण करता येणार आहे. DCGI कडून त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोवॅक्सिन लस बनवली आहे. कोवॅक्सिन ही भारतीय कोरोना लस आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोवॅक्सिन लस कोरोना विषाणूविरूद्ध सुमारे 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून यासंदर्भात लवकरच गाईडलाईन्स जारी केल्या जातील. मुलांना प्रौढांप्रमाणे कोवॅक्सिनच्या दोन लस दिल्या जातील. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये, या लसीमुळे मुलांना कोणतेही नुकसान झालेले नाही.

भारत बायोटेकने सप्टेंबरमध्ये मुलांवर लसीच्या चाचण्या पूर्ण केल्या आणि डेटा सादर केला होता. मूल्यांकनानंतर DCGI ने कंपनीकडून अतिरिक्त डेटा मागितला होता. तो शनिवारी सादर करण्यात आला होता. कालही विषय तज्ज्ञ समितीची (Subject Expert Committee) यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर आजच्या बैठकीत 2 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस देण्याची मान्यता देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत