मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात तपास सुरु केला आहे. हा तपास फॉरेन एक्सचेन्ज मॅनेजमेन्ट अॅक्टच्या (FEMA) उल्लंघन प्रकरणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅमेझॉनच्या विरोधात ईडीने तपास सुरु केला आहे. या कारवाईचे निर्देश वाणिज्य मंत्रालयाकडून ईडीला देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. अॅमेझॉनच्या अडचणी वाढण्याची […]
टॅग: अॅमेझॉन
खळ्ळखट्याक… पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं मनसे कार्यकर्त्यांनी फोडली
मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत. अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टाची नोटीस, मनसे अॅमेझॉनविरोधात आक्रमक
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील दिंडोशी कोर्टाने नोटीस बजावली आहे. ५ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. या नोटिशीनंतर मनसे आक्रमक झाली असून, याची किंमत अॅमेझॉनला मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसे आणि अॅमेझॉन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या वेबसाइटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध […]
गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला १०० दशलक्ष युरो चा दंड, जाणून घ्या कारण
डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो (४.२ कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे. फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं हा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या फ्रेंच वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही. त्या जाहिरातींच्या उद्देशानं आपल्या कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या […]




