मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी आज कोळी बांधव आणि वारकरी कृष्णकुंजवर आले आहेत. सरकारने राज्यात अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाहीये. कार्तिकी एकादशीही जवळ आल्यानं पंढरपूर मंदिर सुरु करावं, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वारकरी आले होते.
राज ठाकरेंनीही वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात, अशी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकी दिली जात नाही, अशी तक्रार राज ठाकरेंकडे मांडली आहे. राज ठाकरेंकडे आमच्या समस्यांवर मार्ग नक्कीच मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘वारकरी संप्रदायाला कार्तिकी वारीसाठी परवानगी देण्यात यावी; आम्ही कोरोना काळातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करू, परंतु पंढरपुरातील संचारबंदी शिथिल करावी’ ह्या मागणीसह वारकऱ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. राज्य सरकारशी बोलून कळवतो, असं राजसाहेबांनी आश्वस्त केलं. #वारकरीपरंपरा pic.twitter.com/6OQ3YtkCoo
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 11, 2020




