कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं यंदाचं शैक्षणिक वर्ष online अभ्यासातच सुरु आहे. परंतु online शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षणात खूप फरक असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात ट्विट करत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. तसेच ऑनलाइन परीक्षा कठीण असल्या तरी देखील यावर काही मार्ग निघतो का याचा विचार सुरू आहे, असं देखील त्या म्हणाल्या.
विद्यार्थी तणावात राहू नये यासाठी सिल्याबस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. #MajhaVision2020 #BackToSchool #MissionBeginAgain @abpmajhatv
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 27, 2020
ऑनलाइन परीक्षा कठीण. तरी देखील काही मार्ग निघतो का याचा विचार सुरू आहे. #MajhaVision2020 #MissionBeginAgain #BackToSchool @abpmajhatv
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 27, 2020