crime
देश

धक्कादायक! पत्नीने ब्लेडने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट, त्याला नपुंसक बनवून करायचे होते दुसरे लग्न…

राजस्थान : राजस्थानमधील बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला होता. आता या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आली आहे. आरोपी पत्नीने सुनियोजित कट रचून पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला होता. त्याला नपुंसक बनवून तिला दुसरे लग्न करायचे होते. याप्रकरणी पतीने आरोप केला आहे की, ‘पत्नीने ब्लेडने  त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. ही घटना बाडमेर जिल्ह्यातील धोरिमान्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालीसर गावात घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीने 1 ऑक्टोबरच्या रात्री पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला होता. याप्रकरणी मंगळवारी पीडित पतीने एसपींची भेट घेतली, त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी सुमारे महिनाभर पीडित पतीने पंचायतीच्या माध्यमातून हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

याप्रकरणी भालीसर येथील गोगाराम (21) याने पोलिसांकडे दिलेल्या अहवालात सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी त्याचे कानू देवी (19) हिच्याशी लग्न झाले होते. ती बाडमेरची रहिवासी आहे. पीडित पतीने सांगितले की, 1 ऑक्टोबरच्या रात्री तो पत्नीसोबत शेतात बांधलेल्या घरात झोपला होता. रात्री उशिरा त्याची पत्नी तिच्या बहिणीशी बोलत होती. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. थोड्या वेळानंतर पती गोगाराम झोपी गेला. यादरम्यान पत्नीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केले. त्यानंतर त्याने जोरात आरडाओरडा केला आणि त्याचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य धावत आले आणि त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, दोन्ही कुटुंबांमध्ये पंचायत स्तरावर चर्चा सुरूच होती. मात्र, आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पीडित पतीने पोलिसांना सांगितले की, हल्ल्यानंतर त्याने पत्नी कानूला तू असे का केलेस, असे विचारले असता, तिला तिच्या बहीण आणि मेहुण्याने असे करण्यास सांगितले असल्याचे तिने सांगितले. त्यांनी तिला सांगितले होते कि, ‘पतीचा प्रायव्हेट पार्ट काप, ज्यामुळे तो नपुंसक होईल आणि त्यानंतर त्याला घटस्फोट दिल्यानंतर आम्ही तुझे लग्न तुझ्या आवडीच्या मुलाशी करू.’

मात्र, या घटनेनंतर 6 ऑक्टोबर रोजी गोगारामच्या पत्नीने पती आणि इतर सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून ती तिच्या माहेरच्या घरी राहत होती. गोगाराम आणि कानूचा विवाह साटेलोटे पद्धतीने झाला होता. गोगारामची बहीण पुष्पा हिचा विवाह कानुदेवीचा भाऊ लखाराम याच्याशी झाला होता. या घटनेबद्दल कानुला तिची बहीण जेठी आणि तिचा पती हुकाराम यांचा फोन आला होता. या दोघांच्या सांगण्यावरून कानूने हे कृत्य केले. सुदैवाने गोगारामच्या प्रायव्हेट पार्टला खोल जखम झाली नाही, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी आता पोलीस दोन्ही पक्षांची चौकशी करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत