काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराला घेराव घालून व्यापक शोध मोहीम राबविली जात आहे.
याआधी शुक्रवारी शोपियांमधील लिटर अग्लर भागात तैनात सीआरपीएफच्या नाका पार्टीला आणि पोलिसांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत फायरिंग केली होती. त्यानंतर दहशतवादी पळून गेले होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नव्हती.




