BJP leader and actress Sonali Phogat dies of heart attack in Goa
देश

ब्रेकिंग! सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, आढळल्या अनेक जखमांच्या खुणा

Sonali Phogat’s Autopsy Report : भाजप नेत्या सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. सोनालीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार ही दुखापत कुठल्यातरी जड किंवा घन वस्तूमुळे झाली असावी.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यापूर्वी गोवा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी तिचा पीए आणि त्याच्या साथीदारावर बलात्कार, हत्येचा आरोप केला होता. यासोबतच गोवा पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सोनाली फोगट मृत्यूप्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ (हत्या) जोडण्यात आले आहे, असे आयजीपी ओएस बिश्नोई यांनी सांगितले. या प्रकरणात सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांना आरोपी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 22 ऑगस्टला सांगवान आणि वासी तिच्यासोबत होते.

सोनाली फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने बुधवारी अंजुना पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. आदल्या दिवशी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये फोगटचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत