Indian Air Force trainee plane crashes in Telangana, 2 pilots killed

भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तेलंगणात कोसळले, 2 वैमानिकांचा मृत्यू

देश

तेलंगणा : भारतीय भारतीय हवाई दलाचे पिलाटस ट्रेनर विमान तेलंगणातील दिंडीगुल येथे कोसळलं आहे. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना Pilatus PC 7 Mk II हे विमान कोसळलं. विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केलं. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वैमानिकांपैकी एक प्रशिक्षक होता, तर दुसरा हवाई दलातील प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. Pilatus PC7 Mk 2 हे विमान सकाळी वायुसेना अकादमीतून नियमित प्रशिक्षणासाठी निघालं होतं. परंतु, काही वेळाने विमानाचा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानातील दोन्ही पायलटचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर विमानाने पेट घेतला. Pilatus PC7 Mk 2 हे लहान विमान असून वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते.

या विमान अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला. भारतीय हवाई दलाचा गेल्या आठ महिन्यांतील हा तिसरा विमान अपघात आहे. याआधी जूनमध्ये कर्नाटकातील चामराजनगरमध्ये आयएएफचं किरण ट्रेनर विमान कोसळलं होतं. मात्र, यावेळी जेटमध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटचा वापर करून त्यांचे प्राण वाचवले. तर मे महिन्यात भारतीय लढाऊ विमान मिग-21 राजस्थानमध्ये कोसळलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत