Shankaracharya of Dwarka Peeth Swami Swaroopanand Saraswati dies at the age of 99
देश

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे देहावसान, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मध्य प्रदेश : सनातन धर्माचे ध्वजवाहक जगतगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे देहावसान झाले आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता त्यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी नरसिंगपूर येथील झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात अखेरचा श्वास घेतला. ते दोन मठांचे (द्वारकेचे शारदा पीठ आणि ज्योतिमठ बद्रीनाथ) शंकराचार्य होते. 2 सप्टेंबर रोजी त्यांनी 99 वा वाढदिवस साजरा केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हिंदूंचे महान धर्मगुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म 2 सप्टेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धार्मिक तीर्थयात्रा सुरू केली. यादरम्यान ते काशीला पोहोचले आणि येथे त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी कर्पात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग, शास्त्र शिकले.

हा तो काळ होता जेव्हा भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्याचा लढा चालू होता. 1942 मध्ये ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही उडी घेतली आणि वयाच्या 19 व्या वर्षी ते ‘क्रांतिकारक साधू’ म्हणून प्रसिद्ध झाले. यावेळी त्यांनी नऊ महिने वाराणसी तुरुंगात आणि सहा महिने मध्य प्रदेशच्या तुरुंगातही काढले. स्वातंत्र्यलढ्यातील संन्यासी म्हणून त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

जगतगुरूंच्या निधनामुळे त्यांचे करोडो अनुयायी शोकसागरात बुडाले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. प्रियांका यांनी ट्विट केले की, “जगतगुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांच्या महाप्रयाणाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. स्वामीजींनी आपले संपूर्ण जीवन धर्म, अध्यात्म आणि परोपकारासाठी वाहून घेतले. २०२१ मध्ये प्रयागराजमध्ये गंगेत स्नान केल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मला त्यांच्याशी देश आणि धर्माच्या औदार्य आणि सद्भावनाविषयी चर्चा करण्याची संधी मिळाली. माझ्या वडिलांच्या वास्तव्यात 1990 मध्ये स्वामीजींनी आमची गृहप्रवेश पूजा केली होती. ही संपूर्ण समाजाची कधीही भरून न येणारी हानी आहे. या कठीण काळात स्वामीजींच्या अनुयायांना हे संकट सहन करण्याची हिंमत देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ॐ शांति!”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत