School Bus accident In Himachal Pradesh
देश

खासगी शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात 12 मुले जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील लमलेहडी येथे खासगी शाळेची बस उलटली आहे. या अपघातात बसमधील १२ मुले जखमी झाली आहेत. त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमी मुलांना उना प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शाळा सुटल्यानंतर बस मुलांना सोडण्यासाठी जात होती. यावेळी बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ही बस 20-30 मीटर खड्ड्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मुलांचे पालकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत