Madhya Pradesh : Around 30 People Fell In A Well In Ganjbasoda
देश

मौत का कुआ! एकाला वाचवताना ३० जण विहिरीत पडले, त्यापाठोपाठ बचावकार्य करणारा ट्रॅक्टर पडला आणि…

मध्य प्रदेश : भोपाळपासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये गुरुवारी भयंकर दुर्घटना घडली आहे. लाल पठार गावात एक ८ वर्षांची मुलगी विहिरीत पडली, त्यामुळे विहिरीभोवती मोठी गर्दी झाली, त्यानंतर या जमा झालेल्या गर्दीतील ३० लोक विहिरीत पडले. आतापर्यंत या विहिरीतून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, गंजबासौदाच्या लाल पठार गावात काल गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. एक ८ वर्षांची मुलगी अनावधानाने या परिसरातील एका विहिरीत पडली. ही विहीर जवळपास ३० फूट खोल असून विहिरीत १० ते १५ फुटांपर्यंत पाणी आहे. मुलगी विहिरीत पडल्याचे समजल्यानंतर या विहिरीभोवती गर्दी गोळा झाली. या विहिरीला वरतून सिमेंटेड स्लॅब होता. मात्र, लोकांची एकच गर्दी झाल्याने हा स्लॅबही अचानक कोसळला आणि स्लॅबवर उभे असलेले ३० हून अधिक लोक विहिरीत पडले.

घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीनसहीत बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र, रात्री ११ च्या सुमारास बचावकार्य करणारा एक ट्रॅक्टर देखील जमीन खचल्याने कोसळला. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून या भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत १९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश मिळालं असून चार मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही लोक बेपत्ता आहेत.

या घटनेची माहिती मिळाली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे विदिशातच आपल्या दत्तक घेतलेल्या मुलींच्या विवाहात उपस्थित होते. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम्स भोपाळकडे बचावकार्यासाठी रवाना केल्या. तसेच पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, जिल्हाधिकारीसहीत सगळ्या अधिकाऱ्यांना बचावकार्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री चौहान स्वत: या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. आपण सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तसंच जखमींना ५० हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य आणि जखमींना मोफत उपचाराची सोय देण्याची घोषणा केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत