उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात एका पित्याने आपल्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. पत्नीने पतीला दारू पिण्यास नकार दिल्यानंतर रागाच्या भरात पतीने हे भयंकर कृत्य केले. जन्मदात्या पित्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. त्यानंतर आरोपी पिता फरार झाला. याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील आदमपूर येथील रहिवासी प्रेमचंद उर्फ रवी याचा चार वर्षांपूर्वी खुशबू नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. त्यांचा दोन वर्षांचा लवकुश नावाचा मुलगा होता. प्रेमचंदला दारू पिण्याचे व्यसन होते. तो अनेकदा दारू पिऊन घरी आल्यावर खुशबूला मारहाण करायचा. शुक्रवारी खुशबूने त्याला दारू पिण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वादादरम्यान, प्रेमचंद याने दोन वर्षांचा मुलगा लवकुश याला जमिनीवर फेकले, ज्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी प्रेमचंद फरार आहे.
खुशबूने सांगितले की, तिच्या दोन वर्षांच्या मुलाला तिच्या पतीने जमिनीवर फेकून मारले. कोणतेही वाद नव्हते. फक्त दारू पिण्यास नकार दिल्यामुळे वाद झाला होता. मुलगा तिच्या मांडीवर होता. मात्र रागाच्या भरात प्रेमचंद्रने मुलाला हिसकावून घेतले आणि त्याला विटांच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले. त्यामुळे मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




