देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. करोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात सर्व सामान्य ग्राहकांना याचा फायदा होईल.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आता खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार नाही. इतकंच नव्हे, तर यापुढे बँक ग्राहकांकडून SMS शुल्क देखील आकारले जाणार नाही. हा नवा नियम बँकेच्या सर्व बचक खाते धारकांना लागू होणार आहे. बँकेच्या ४४ कोटी हून अधिक ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.




