Found womens body in the suitcase when opened
क्राईम देश

बेवारस सुटकेसभोवती फिरत होते कुत्रे, सुटकेस उघडताच सरकली पायाखालची जमीन

हरियाणा : गुरुग्राममधील इफको चौकात सोमवारी संध्याकाळी असे काही दिसले, जे पाहून लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. येथे एक बेवारस सुटकेस सापडली आहे, ज्यामध्ये महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मृत महिलेची ओळख पटलेली नसून महिलेची अन्य ठिकाणी हत्या करून तिच्या मृतदेहाची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, इफको चौकाजवळ एक मोठी सुटकेस पडून होती. या बेवारस सुटकेसभोवती कुत्रे फिरत होते आणि वारंवार सुटकेसचा वास घेत होते, ही बाब लक्षात येताच लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ  घटनास्थळी पोहोचले. मात्र, सेक्टर-18 पोलीस ठाण्याने स्फोटके असल्याच्या भीतीने घेराव घातल्यानंतर लोकांना परिसरापासून दूर केले. त्याचवेळी बॉम्बविरोधी पथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान सुटकेस उघडली असता त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे महिलेचे काही कपडे देखील सूटकेसमध्ये ठेवले होते.

तथापि, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून, मृतदेह शवागारात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनचे म्हणणे आहे की, महिलेचे वय अंदाजे 30 वर्षे असून परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून ही सुटकेस कोणी ठेवली, याचा तपास केला जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत