Two bodies were found in a canal in Fursungi village
देश

महिला इन्स्पेक्टरला गौ-तस्करांच्या पिकअपने चिरडले, जागीच मृत्यू, 24 तासांत अशा 2 घटनांनी खळबळ

झारखंड : झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका महिला निरीक्षकाची पीकअपने चिरडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण जिल्ह्यातील तुपुदाना ओपी परिसरातील हुलहुंडू येथील आहे. जिथे वाहन तपासणी दरम्यान 2018 बॅचच्या निरीक्षक संध्या टोपनो यांना गुरांनी भरलेल्या पिकअप व्हॅनच्या चालकाने चिरडले. या घटनेत महिला इन्स्पेक्टरचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काल हरियाणामध्ये खाण माफियांनी DSP सुरेंदर सिंग यांच्या अंगावर डंपर घातला होता, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, गौ-तस्कर सिमडेगा येथून पिकअप व्हॅनमध्ये गुरांची तस्करी करणार असल्याची माहिती सिमडेगा पोलिसांना मिळाली. त्यानंतर सिमडेगा येथील बसिया पोलीस ठाण्याच्या पथकाने पिकअप व्हॅनचा पाठलाग केला. यावेळी पिकअप व्हॅनच्या चालकाने जनावरांनी भरलेले वाहन घेऊन पळ काढला. घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कामदरा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

चालकाने बॅरियर तोडून पळ काढला
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तेथे बॅरियर लावला, मात्र चालकाने तो तोडून पळ काढला. त्यानंतर तोरपा पोलिसांनी लावलेले बॅरियर तोडून देखील त्याने पळ काढला. त्यानंतर खुंटी पोलिसांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. खुंटी पोलिसांनी रात्री नाक्यावर चेक लावला, मात्र तेथून चकमा देत आरोपींनी दुसऱ्या मार्गाने रांचीच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर सिमडेगा पोलिसांनी रांची पोलिसांना माहिती दिली.

रांची पोलिसांनी खुंटी रांची सीमेवरील तुपुदाना ओपी क्षेत्राच्या हुलहुंडूजवळ तपासणी केली. दरम्यान, तीन वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची पिकअप व्हॅन भरधाव वेगाने येताना दिसली. येथे उपनिरीक्षक संध्या टोपनो या चेकिंग पोस्टवर टीमसह उपस्थित होत्या. त्यांनी वाहनाला थांबण्याचा इशारा दिला, मात्र चालकाने पिकअप महिला निरीक्षकाच्या अंगावर घातली आणि तेथून पळ काढला. यामध्ये महिला इन्स्पेक्टरचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर गस्ती पथकाने आरोपींचा पाठलाग केला. मात्र आरोपी रिंगरोडच्या बाजूने भरधाव वेगाने निघाले. यादरम्यान, रिंगरोडमध्ये पिकअप व्हॅन पलटी झाली. अनेक तस्करांनी पिकअप व्हॅनमधून उड्या मारून पलायन केले. पिकअप व्हॅनचालक पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस इतरांचा शोध घेत आहेत.

संतापजनक! खाण माफियांनी DSP सुरेंदर सिंग यांच्या अंगावर घातला डंपर, जागीच मृत्यू

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत