नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. महिलेला नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
वृत्तानुसार, एका महिलेने दिल्लीतील उत्तम नगर पोलिस स्टेशनमध्ये सोनिया गांधींचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेचा पती काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये होर्डिंग लावण्याचे काम करत होता, मात्र २०२० मध्ये त्याचे कोरोनाने निधन झाले. दरम्यान, ही महिला काम मिळवण्यासाठी सोनिया गांधींचे स्वीय सचिव पीपी माधवन यांना भेटत होती. त्यानंतर या महिलेला नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.




