जयपूर : कॉंग्रेसचे आमदार गजेंद्रसिंग शक्तावत यांचे दीर्घ आजाराने आज (बुधवारी) सकाळी निधन झाले. गेल्या वर्षी राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या वेळी सचिन पायलट यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या 18 आमदारांपैकी ते एक होते.
गजेंद्रसिंग शक्तावत यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत उपचार सुरू होते. त्यांना यकृत संसर्ग झाला होता तसेच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले कि, “माझे सहकारी व आमदार श्री गजेंद्रसिंग शक्तावत जी यांचे निधन झाल्याच्या बातमीने मी अतिशय दुखी झालो. ते नेहमी नम्र आणि दयाळू होते आणि ते नेहमीच आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी समर्पित होते. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी मनापासून दुःख व्यक्त करतो.
I am deeply saddened by the devastating news of the passing away of my colleague & MLA Shri Gajendra Singh Shaktawat ji. He was a humble and a kind soul, always dedicated towards the development of his constituency. My heartfelt condolences to his family.
— Sachin Pilot (@SachinPilot) January 20, 2021




