shivsena dasara melava

कसा असेल शिवसेनाचा दसरा मेळावा, शिवसेनेच्या आजच्या दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व – संजय राऊत

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा , २०१९ चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्वाचा होता. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोलत होतो. मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. त्यामुळे आजच्या दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतिर्थाच्या बाजूला असलेल्या वीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असून त्यास नियमाप्रमाणे ५० जणच उपस्थित राहतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. वृत्तवाहिनीशी बोलत दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपाला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, करोना नसता तर शिवतिर्थ अपुरं पडलं असतं. दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलच.

राऊत यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे –

  1. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस करोनाबाधित झाले आहेत. फडणवीसांना वारंवार सांगत होतो काळजी घ्या. करोना कोणालाही सोडत नाही.
  2. लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत.
  3. ऐतिहासिक मेळाव्याला जनाची मनाची काढली जाते.
  4. व्यासपिठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलणार नाहीत, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
  5. करोनाचं संकट नसते तर शिवतिर्थ अपुरं पडलं असतं.
  6. मुख्यमंत्र्यांचं संबोधन ऐकण्यासाठी शिवतिर्थावर तुफान आलं आसतं.
  7. दसरा मेळावावीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणार असून समाजमाध्यमांच्या थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांना तो पाहता येणार आहे.
  8. ज्या पद्धतीनं मेळावा साजरा करतो त्याच पद्धतीनं साजरा करु.
  9. सर संघचालक आमचे आदर्श आहेत. त्यांनीही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रेशीम बागेतील सभागृहात मेळावा घेतला. तसाच मेळावा शिवसेना घेत आहे.
  10. आम्ही नियम पाळतो म्हणून मोजक्या लोकांच्याच उपस्थितीत मेळावा घेतोय. पण बिहारमध्ये ५० हजार लोकांचे मेळावे चालले आहेत. त्याचं काय? आता तुम्हीच सांगा, जनाची, धनाची आणि मनाची लाज काढत आहेत.
  11. जनाची मनाची आहे म्हणूनच हा मेळावा शिवतिर्थावर न घेता यंदा सभागृहात घेतला आहे.

सीमोल्लंघन होणार, उद्धव ठाकरे यांनी त्याची पुर्ण तयारी केली आहे. गेल्या ५५ वर्षांपासून सीमोल्लंघन होतोय. यंदाही होणार. पण आजच सीमोल्लंघन कसं असेल ते रात्रीच तुम्हाला समजेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत