पुणे : हांडेवाडी-मंतरवाडी रस्त्यावर काल सकाळी दुर्दैवी अपघात झाला, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात हांडेवाडी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर घडला.
या अपघातातील मृतांची ओळख पटली असून ते आहेत – संतोष प्रल्हाद कांबळे (वय ४९, रहिवासी हांडेवाडी रोड, मूळचे अहिल्यानगर) आणि सदाशिव गोरख फुलावे (वय ३६, रहिवासी उरुळी देवाची). दोघेही हांडेवाडीहून मंतरवाडीकडे दुचाकीवर जात होते.
मिळालेल्यामाहितीनुसार, संतोष आणि सदाशिव यांची दुचाकी अचानक पेट्रोल पंपाजवळ घसरली आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने (एमएच १२ व्हीएफ ३४०१) दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दोन्ही स्वार ट्रकखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी ट्रक चालक नागेश नाना कोरडे (वय ३५, रहिवासी उपलाई) सोलापूर याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.




