Chief Minister Uddhav Thackeray

राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र

सांगली : राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी आहे, त्या भागात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल. ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे मात्र निर्बंध कायम राहतील, असं त्यांनी सांगितलं. खासगी कार्यालयांनी कामाच्या वेळात बदल करून वेगवेगळ्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट लावाव्यात. तसेच एकाच वेळी कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

पुण्यासह राज्यातील काही व्यापारी संघटनांनी दुकानांच्या वेळा वाढवल्या नाहीत, तर कायदा मोडून दुकानं सुरु ठेऊ, अशी भूमिका घेतली होती. त्यावर आपण व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही, तर जनतेच्या हिताची आपल्याला अधिक काळजी असल्याचं ते म्हणाले. मात्र त्याचवेळी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना कमी आहे, अशा जिल्ह्यांतील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवायला परवानगी मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की, आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालं आहे. कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले कि, “मी दोन-चार दिवसांपासून सर्वांना सांगतोय की काही ठिकाणी काही प्रसंगी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण आपली कामं, ज्याला आपण विकास कामं म्हणतो ती करत गेलो. पण आता आपत्तीची वारंवारता जर आपण पाहिली, तर आपत्तीचं स्वरूप हे अधिकाधिक भीषण होत चाललेलं आहे. काही दिवसांचा काही महिन्यांचा पाऊस हा काही तासांत किंवा एक दिवसात पडायला लागलेला आहे. प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होते आहे. दरडी कोसळत आहेत, रस्ते खचत आहेत.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत