State Level Award Somnath Gite
पुणे महाराष्ट्र

डॉ. सोमनाथ गिते यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान

पुणे : राज्यस्तरीय गुणिजन गौरव सन्मान सोहळा नुकताच पुणे शहरातील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणवंताना राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय कीर्तनकार- कवी – विचारवंत – व्याख्याते ह. भ. प. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर आणि इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे. सानिपीना राव यांच्या हस्ते डॉ. सोमनाथ गिते यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ह. भ. प. आळंदीकर महाराज यांनी केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी भारतीय संविधानाला अपेक्षित अशी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि मूल्ये समाजात खोलवर रुजविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. डॉ. सानिपीना राव यांनी केलेल्या भाषणात गुणिजनांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करून याच प्रेरणेतून आणखी मोठे कार्य उभे राहील, असा आशावाद व्यक्त केला. समारंभाचे व्यवस्थापन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या शिक्षणतज्ज्ञ सौ. मनिषा कदम यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी प्रकाश सावंत, लक्ष्मणराव दाते, अमोलराव सुपेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कारास पात्र ठरलेल्या मानकरी गुणिजनांचे उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली.

यावेळी सोमनाथ गिते यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, मी गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीवर काम करत आहे. या कामाची दखल घेत मला राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा विशेष आभारी आहे. या पुरस्कारामुळे जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत आहे. त्यांना व्यसनपासून रोखणे हे पुढील काळात सर्वात मोठे आव्हान असणार आहे. यावरती सरकारने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अनेक राज्यांनी दारूबंदी केली आहे, त्या राज्यांमध्ये तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण कमी आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत