the death of three members of the sheikh family in pune who went for a picnic
पुणे महाराष्ट्र

पत्नी आणि मुलानंतर आता आढळला आबीद शेख यांचा मृतदेह, गूढ वाढलं…

पुणे : पुण्यातील शेख कुटुंबीय काही दिवसांपूर्वी पिकनिकसाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील एका नदीत आढळून आला. आबीद शेख यांच्या मृतदेहासोबत काही कागदपत्रे सापडले असून त्यात आलिया शेख यांच्या आधार कार्ड आणि ओळखपत्राचा समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यातील सासवडमध्ये 15 जून रोजी सकाळी आलिया शेख या महिलेचा मृतदेह आढळला होता तर रात्री या महिलेचा मुलगा अयान शेख याचा मृतदेह नवीन कात्रज बोगद्याजवळ सापडला. आलिया यांचे पती आबीद शेख मात्र बेपत्ता होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. परंतु आज (18 जून) आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील नदीत सापडला.

हे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशमधील असून सध्या पुण्यातील धानोरी भागात राहात होतं. आबीद शेख एका कंपनीत बॅंक मॅनेजर म्हणून काम करत होते. 11 जून रोजी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रीझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर पडलं होतं, पण 15 जून रोजी सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला आणि रात्री नवीन कात्रज बोगद्यालगत एका सहा ते आठ वर्षांच्या त्यांचा मुलाचाही मृतदेह आढळून आला. आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सोडून दिली होती. तिथे अबिद शेख ही कार पार्क करुन रस्ता ओलांडून जात असताना तेथील सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. तेथून ते कोठे निघून गेले, याचा शोध सुरु होता. याप्रकरणी सासवड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत