High profile sex racket destroyed in Sangli
पुणे महाराष्ट्र

पुणे : दिघी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांवर गुन्हा दाखल

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला परिसरातील इतर महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत होत्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना या भागात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने शुक्रवारी दिघी येथील चर्‍होली फाट्याजवळ छापा टाकत कारवाई केली. दरम्यान, यावेळी तेथील महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी महिला परिसरातील इतर महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत असल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात दिघी पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 370 (3) आणि 37 सह अनैतिक तस्करी (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत