पुणे : लोहेगाव येथील एअर फोर्स कॉलनीत दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास दोन वर्षांचा विदार्थ विपिन मावी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विदार्थ आपल्या घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिला रहिवाशीनं त्याला कारने धडक दिली.
विदार्थ घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिलेच्या कारची त्याला धडक बसली. दरम्यान, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी, विदार्थचे वडिल विपिन राजसिंह मावी (वय ३४) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. विपिन हे भारतीय हवाई दलाचे अधिकारी आहेत.
पोलिसांनी माहिती दिली की, महिला चालकाविरुद्ध FIR नोंदवली गेली आहे. अपघाताची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी कॉलनीतील रहिवाशांना शांती राखण्याचे आवाहन केले आहे आणि अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरु आहे. विदार्थच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व घटनांचा तपशील घेत असून, योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.




