पुणे : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर अल्पवयीन मुलाने या मुलीला भेटायला बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी दोनदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही घटना पुण्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती, त्यांच्यात ओळख निर्माण झाल्यावर त्याने तिला कारेगाव येथील त्याच्या घरी नेले होते. यादरम्यान, त्याने तिच्यावर खूप प्रेम असल्याचे सांगितले आणि त्याला ती आवडत असल्याचे सांगून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही घटना ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता आणि ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घडली. मात्र, त्यानंतर त्याने या प्रकरणाबद्दल कोणालाही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
घटना उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलाला या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.