Police operation in Gunaat village, Pune, to capture accused in Swargate rape case.
पुणे महाराष्ट्र

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अपडेट : आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची व्यापक मोहीम

पुणे : स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37) याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, विशेषतः गुनाट गावात ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते, जिथे तो लपल्याचा संशय होता. आरोपी दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा राहिवासी आहे. आरोपी 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्यानंतर त्याच्या गुनाट गावी गेला. त्याच्या अटकेसाठी पोलीस सतर्क झाल्यानंतर तो फरार झाला आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा काल रात्री शेतात असलेल्या एका घरात पाणी पिण्यासाठी गेल्याची माहिती आहे. आरोपी गुनाट गावातील ऊसाच्या शिवारात लपला असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे जवळपास 100 पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात दाखल झाला. पोलिसांनी आरोपीचा युद्ध पातळीवर शोध घेतला. मात्र, 25 एकर परिसरातील शेतशिवाराची पहाणी करुनही दत्ता गाडेचा शोध लागला नाही. तसेच, या परिसरात बिबट्याचा देखील वावर आहे. अखेर, आरोपी सापडत नसल्याने पोलिसांना माघारी येण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आतापर्यंतच्या मुख्य घडामोडी :

२५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस स्टँडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) थांबलेल्या शिवशाही एसी बसमध्ये आरोपीने २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. आरोपी महिलेकडे गेला आणि तिला ‘ताई’ असे संबोधले आणि तिला सांगितले की साताराला जाणारी बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे. गाडेने महिलेला पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये चढण्यास सांगितले. ती बसमधील अंधार बघून विचार करत असताना, त्याने तिला खात्री दिली की ही योग्य बस आहे आणि नंतर तिच्यामागे आत जाऊन तिच्यावर अत्याचार केला. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, त्यामुळे तातडीने पोलिस तपास आणि शोध मोहीम सुरू झाली.

पोलिसांनी पोस्टर जारी केले, बक्षीस जाहीर केले : आरोपीचे पोस्टर प्रसारित केले आहे आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला पकडण्यासाठी कोणतीही माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

जनतेच्या मदतीसाठी आवाहन: गाडेच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित अटक करण्यास मदत करण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी जनतेला केले आहे.

आरोपीचा युद्ध पातळीवर शोध सुरु : आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १०० हून अधिक पोलिस कर्मचारी गुनाट गावात पोहोचले.

ड्रोन आणि श्वान पथक तैनात : आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन ड्रोनचा वापर केला, तसेच श्वान पथक आणण्यात आले.

तेरा पथके कार्यरत : पुणे शहर पोलिसांची १३ पथके आरोपीला शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी काम करत आहेत.

ऊसाच्या शेतात शोध : अधिकाऱ्यांना संशय होता की गाडे गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपला आहे, त्यामुळे तिथे शोध मोहीम सुरू केली होती. पोलिसांकडून अत्यानुधिक ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला होता. परंतु, 25 एकर परिसरातील शेतशिवाराची पहाणी करुनही दत्ता गाडेचा शोध लागला नाही. आरोपी सापडत नसल्याने अखेर पोलिसांना माघारी येण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पोलिसांनी आरोपी गाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (बलात्कार) आणि 351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गाडे याच्या काही मित्रांची आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वारगेट बस डेपो आणि इतर ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. फॉरेन्सिक तज्ञांनी गुन्हा घडलेल्या बसची तपासणी केली आहे. पोलिसांनी बस चालकाचा देखील जबाब नोंदवला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत