Junaid Mohammad, accused of having links with terrorists, has been remanded in police custody till June 3
पुणे महाराष्ट्र

पुणे : दहशतवाद्यांच्या संपर्कातील तरुणाला 3 जुनपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : जुनेद मोहम्मद या तरुणास 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून त्याला आज अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनूसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता. आरोपीला काही वेळापूर्वी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी न्यायालयाने त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत