court order
पुणे महाराष्ट्र

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील सहा आरोपींना दुहेरी जन्मठेप

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील सहा आरोपींना मकोका न्यायालयाने दुहेरी जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याप्रकरणी विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी ४२ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नोंदविलेला आरोपींचा कबुली जबाब, बॅलेस्टीक तज्ज्ञ डॉ. कुतुबुद्दीन मुलाणी यांची साक्ष आणि शव विच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींना अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शाह यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला. फिर्यादीतर्फे ऍड. सुहास कोल्हे यांनी कामकाज पाहिले.

संतोष भिमराव शिंदे (वय ३४), निलेश खंडू सोलनकर (वय ३०), राजेंद्र विजय गायकवाड (वय २४), आकाश सुनिल महाडीक (वय २०), विष्णू यशवंत जाधव (वय ३७), नागेश लक्ष्मण झाडकर (वय २७) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना कट रचणे आणि खून करणे या कलमांखाली दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरण :

कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे याचा मे २०१५ मध्ये गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. अप्पा लोंढे याची बारामती, दौेंड, हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. १९९० पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. चार गुन्ह्य़ांमध्ये त्याला शिक्षा झाली होती.

लोंढे हा दररोज पहाटे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडायचा. घटनेच्या दिवशी पहाटे सव्वापाचच्या सुमारास तो चालण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर शिंदावणे रस्त्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला. त्याच्या छातीत व पोटात गोळ्या लागल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत