A committee will be set up at the entrance of the Pune Market Committee to study the recovery of ces
पुणे महाराष्ट्र

पुणे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील सेसची वसुली बाजार समितीमार्फत थेट खरेदीदारांकडून प्रवेशद्वारावर होण्यासाठी विविध व्यापारी असोसिएशन कडून मागणी करण्यात आली आहे. गेटवर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय देशमुख, सचिव संदीप देशमुख, पणन संचालनालयाचे सहसंचालक विनायक कोकरे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक गरड आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, शेतकरी व ग्राहकांचे हीत लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकले पाहिजे. समितीच्या कामकाजात गैरव्यवहार आणि कामगारांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका फिरतांना कुठल्याही प्रकारची अडचण होता कामा नये, अशा सुचना त्यांनी दिल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तसेच आडतिया असोसिएशन आणि पुना मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत