Fatal accident in Saptshringi Ghat when a bus with 22 passengers fell into the valley
नाशिक महाराष्ट्र

सप्तश्रृंगी घाटात २२ प्रवाशांसह बस दरीत कोसळून भीषण अपघात, मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांच्या मदतीची घोषणा

नाशिक : नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही प्रवाशांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. यात १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी आहेत, तर  बस चालक व कंडक्टरचा समावेश आहे. बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याचं खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.

बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांमुळे चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाला. त्यानंतर बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत