Boyfriend arrested for chasing young woman and stabbing her

तरुणीचा पाठलाग करत केले चाकूचे वार, प्रियकराला अटक

नागपूर महाराष्ट्र

नागपूर : प्रियकराने २५ वर्षीय तरुणीला चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी केडीके कॉलेज मार्गावरील राजेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. जखमी तरुणीवर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी हल्लेखोर प्रशांत भारसागळे (वय २४) याला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संबंधित तरुणी हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. प्रशांत गोंदियात खासगी काम करतो. दीड वर्षांपूर्वी मोबाइलवर आलेल्या मिस्ड कॉलमुळे या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, मागील १५ दिवसांपासून ही तरुणी प्रशांतला टाळायला लागली. ती मोबाइलवर त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे राग अनावर होऊन त्याने हे कृत्य केलं.

ही तरुणी सकाळी ११ वाजता हॉस्पिटलमधून घरी जात असताना प्रशांतने तिचा पाठलाग करत राजेंद्रनगर भागात तिला अडविले आणि चाकूने सपासप तरुणीच्या गळ्यावर आणि पोटावार वार केले. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेत प्रशांतला पकडून चोप दिला. काही नागरिकांनी तरुणीला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून प्रशांतची सुटका केली. त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेले. तरुणी त्याला टाळायला लागल्याने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे प्रशांतने पोलिसांसमोर काबुल केले. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करत प्रशांतला अटक केली आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत